संयुक्त राष्ट्रांचा 'शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन (World Science Day for Peace and Development)' दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • सदर दिवस हा संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (United Nations Educational, Scientific and Cultural Organization - UNESCO) मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येतो.
  • समाजात विज्ञानाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणे तसेच उदयोन्मुख वैज्ञानिक विषयांवरील चर्चेत सर्वसामान्यांना सहभागी करून घेणे हाया दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • यंदाची २०२६ ची या दिवसाची २५ वी आवृत्ती साजरा केली जात आहे. 
  • २०२६ ची संकल्पना / थीम (Theme): 'विज्ञान मुत्सद्देगिरीद्वारे सामायिक आधार (Common Ground Through Science Diplomacy)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • २००१ साली युनेस्कोमार्फत १० नोव्हेंबर हा दिवस 'शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन' म्हणून घोषित करण्यात आला होता.
  • 'शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन' पहिल्यांदा १० नोव्हेंबर २००२ रोजी साजरा करण्यात आला होता.